काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला, ‘हा’ नेता बनणार तेलंगणाचा नवा Chief Minister

Telangana New CM: तेलंगणातील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत काँग्रेसने चित्र स्पष्ट केले आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) असतील. 7 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा आहे. तेलंगणामध्ये यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. 119 मतदारसंघांपैकी 64 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यावरून सुरू असलेल्या सस्पेंसमध्ये काँग्रेस पक्षाने एक खळबळजनक निर्णय घेतला आहे.

तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांना सीएलपी नेते घोषित करण्यात आले आहे. काँग्रेस आमदारांनी सीएलपी नेते म्हणून निवड केल्यानंतर रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आमदारांचे मत आणि वरिष्ठांशी चर्चा अशा अनेक कसरतीनंतर काँग्रेस पक्ष नेतृत्वाने रेवंत रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. रेवंत रेड्डी ७ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. केसी वेणुगोपाल यांनी उत्तम कुमार रेड्डी आणि भट्टी विक्रमार्का यांच्या उपस्थितीत रेवंतच्या नावाची घोषणा केली.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लिम मुलाशी लग्न केल्यास हिंदू मुली त्यांचे हक्क गमावतील’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Cyclone Michaung चा हाहाकार, चेन्नईत पाच जणांचा मृत्यू; एअरफील्ड बंद

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन – Video