हार्दिक पंड्याला कर्णधार बनवणं मुंबई इंडियन्सला पडलं महागात! आयपीएल खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Hardik Pandya: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बांगलादेश विरुद्धच्या वनडे विश्वचषक 2023 सामन्यात चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. तेव्हापासून हार्दिक पांड्या सतत क्रिकेटपासून दूर आहे.

हार्दिकला त्याच्या कारकिर्दीत अनेकदा दुखापत (Hardik Pandya Injury) झाली आहे, त्यामुळे त्याला गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाच्या सामन्यांपासून दूर राहावे लागले आहे. 2022 च्या टी20 विश्वचषकानंतर, नियमित कर्णधार रोहित शर्माने ‘मेन इन ब्लू’साठी खेळाचा सर्वात लहान फॉरमॅट खेळलेला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिकने टी20 मध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. तथापि, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या अलीकडील टी20 सामन्यांसाठी अष्टपैलू खेळाडू वेळेत बरा होऊ शकला नाही.

हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मधून बाहेर पडू शकतो
आता, काही अहवालांमधून असे समोर आले आहे की हार्दिकचे क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन होण्यास आणखी विलंब होऊ शकतो. कारण 30 वर्षीय हार्दिकला जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारतात होणारी टी-20 मालिका आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी हंगामाला मुकावे लागणार आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “हार्दिकच्या फिटनेस (Hardik Pandya Fitness) स्थितीबद्दल अद्याप कोणतेही अपडेट नाही आणि आयपीएल संपण्यापूर्वी त्याच्या उपलब्धतेवर मोठे प्रश्नचिन्ह कायम आहे. हा केवळ भारतासाठीच नाही तर मुंबई इंडियन्ससाठीही मोठा धक्का असेल. पाच वेळच्या आयपीएल चॅम्पियन्स मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिकला गुजरात टायटन्समधून ट्रेड केले आणि रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधार बनवले.’

मायदेशात अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाला नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. जखमी हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. पण जोहान्सबर्गमध्ये प्रोटीज विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो सुमारे सहा आठवडे खेळापासून दूर राहू शकतो आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून तो बाहेर राहू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली