जनकल्याणाच्या योजना : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर वाटप योजना

प्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर वाटप योजना

योजनेचे स्वरूप: व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावे, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून २ कि.मी. पर्यंतच्या वनाशेजारी गावातील १०० टक्के कुटुंबांना सवलतीच्या दरात स्वयंपाक गॅस पुरवठा करणे.

कार्यान्वयीन यंत्रणा: गॅस सिलेंडर वाटप योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत राबविण्यात येते.

अनुदान: स्वयंपाक गॅस पुरवठ्याकरीता मंजूर करण्यात आलेले अनुदान ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येते.

गॅस पुरवठा या योजनेत समाविष्ट गावांच्या १०० टक्के कुटुंबांना पहिल्या वर्षाकरीता ८ व दुसऱ्या वर्षाकरीता ६ सिलेंडर सवलतीच्या दरात ७५ टक्के शासकीय अनुदान आणि २५ टक्के लाभार्थ्यांचे योगदान तत्वावर देण्यात येते. दोन वर्षात एकूण १४ सिलेंडर न वापरल्यास शिल्लक सिलेंडर पुढील वर्षी लाभार्थ्याला देण्यात येते.

अटी व शर्ती: राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतंर्गत सवलीच्या दराने स्वयंपाक गॅस पुरवठा योजनेचा लाभ न घेतलेले कुटुंब पात्र असतील.

संपर्क: उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग, वनभवन, तिसरा मजला, भांबुर्डा वन विहार, सर्व्हे क्रमांक ९७, गोखलेनगर, पुणे- १६ (दु.क्र.०२०-२५६६८०००, हेल्पलाईन क्रमांक १९२६)