‘जीना’च्या कबरीवर गेलेल्या अडवाणींवर कोणत्या IPC च्या कलमानुसार कारवाई केली? सावंतांचा भाजपला सवाल

मुंबई  – काल एमआयएमचे नेते  अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) औरंगाबादच्या(Aurangabad) दौऱ्यावर  होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी  शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी  स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb)  कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले.

दरम्यान, स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण केल्याने ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर आता टीका होत आहे. भाजप (BJP)आणि विरोधी पक्षांकडून सरकारवर या मुद्द्यावरून टीका होत असताना आता एका अर्थाने ओवेसी आणि सरकारच्या बचावासाठी कॉंग्रेसनेते सचिन सावंत(congress spoke person sachin sawant) पुढे सरसावले आहेत. आपल्या ट्वीट(tweet) मधून त्यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी(Lalkrishna advani) यांना या वादात ओढले आहे.

सचिन सावंत म्हणतात, औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसी गेले तर बोंब ठोकून कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपाने व भाजपाच्या पिट्टूंनी आधी ‘जीना’च्या कबरीवर गेलेल्या अडवाणींवर कोणत्या IPC च्या कलमानुसार कारवाई केली? भाजपाचे सहयोगी नितीशकुमारांनाही जेलमध्ये का टाकले नाही? यांचे उत्तर द्यावे. अजून देश संविधानाने चालतो असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.