संभाजी भिडेंची अर्धी मिशी कापणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस, कोणी केली ही घोषणा?

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide )यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

अशातच संभाजी भिडे यांची अर्धी मिशी कापून आणणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देण्यात अशी घोषणा करण्यात आली आहे. कोणी केली आहे ही घोषणा?

संभाजी भिडे यांची अर्धी मिशी कापणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा समता परिषदेच्या जालना येथील माजी जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केलीय. सातत्याने महापुरुषांच्या वरती टीका करणाऱ्या भिडे यांना सरकार पाठीशी घालत असून, भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आव्हान आहे करत आहे. सर्व ओबीसी चळवळी मधील कार्यकर्त्यांकडुन एक-एक रुपया जमा करून हे एक लाख रुपये देण्यात येतील असंही त्यांनी जाहीर केलंय.