“शिंदे लबाड नाहीत, फडणवीस बेईमानी करणार नाहीत, अजिदादा काळीज असलेला माणूस, मनोजदादा विश्वास ठेवा”

“शिंदे लबाड नाहीत, फडणवीस बेईमानी करणार नाहीत, अजिदादा काळीज असलेला माणूस, मनोजदादा विश्वास ठेवा”

Manoj Jarange- Patil  :  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहे. त्यांच्या याच उपोषणास्थळी आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहे. दरम्यान, याच उपोषणास्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे (Sambhaji Bhide)  यांनी देखील भेट दिली असून ते अंतरवाली गावात दाखल झाले आहे. यावेळी संभाजी भिडे हे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही, असा मूर्ख माणूस म्हणजे मी. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहेत. मागे वळून तुम्ही बघायचंच नाही की आपल्या पाठिशी कोण आहे, असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले.मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. तुम्ही जे करताय ते योग्य आहे.

एक चांगली गोष्ट आहे. आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे. माझं असं मत आहे की आपण हे आंदोलन जिवाच्या आकांतानं तुम्ही चालवत आहात. तुमच्या तपश्चर्येला यश मिळणार. उगीच ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. आणि ते शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे लागलं, असं आश्वासन यावेळी संभाजी भिडेंनी मनोज जरांगेंना दिलं.

ही लढाई आहे. झट की पट एक घाव दोन तुकडे अशी नाही. पण तुमच्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आहे. पण तुम्ही हे उपोषण थांबवावं. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही आमचे प्रमुख आहात. मराठा समाज हिंदुस्थानच्या पाठिचा कणा आहे. तु्म्ही उपोषण थांबवा, लढा नाही. मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण जाऊ सांगुयात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं संभाजी भिडे मनोज जरांगेंना म्हणाले.

https://www.youtube.com/shorts/Y9FMvfnnOd8

महत्त्वाच्या बातम्या-

Total
0
Shares
Previous Post
“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा

“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा

Next Post
प्रीतमताईंना डावलून मी राजकारणात काम करणार नाही - Pankaja Munde

प्रीतमताईंना डावलून मी राजकारणात काम करणार नाही – Pankaja Munde

Related Posts
Ram_Shinde-BJP

भाजपकडून विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदेंचं नाव आघाडीवर

मुंबई – विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे (Ram Shinde) यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी…
Read More
PM Narendra Modi - Letter - Fahmida Hasan Khan

मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा, नमाज पठण करु द्या, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी

मुंबई – राज्यातील जनता सध्या अनेक संकटाचा सामना करत असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र नको त्या विषयात आपला…
Read More

“हिंदू नसूनही शाहरुख, आमिरने त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये अनेक हिंदू कलाकारांना संधी दिल्या”

अलीकडेच अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ- आचार्य कालिदास पुरस्कार’ या सन्मानानं गौरवण्यात आलं. त्यांच्या हिंदुत्वासाठी दिलेल्या…
Read More