विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज

india vs pakistan: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम चार गटातील सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 228 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर राखीव दिवशी भारतीय संघाने पाकिस्तानी गोलंदाजांची दमछाक करुन सोडली. विराट कोहली (virat kohli) आणि केएल राहुल (kl rahul) यांच्या जोडीने द्विशतकी भागिदारी करत मर्यादित 50 षटकात 356 धावा फलकावर लावल्या. यादरम्यान दोघांनीही वैयक्तिक शतके केली. या धाकड शतकी खेळीनंतर विराटने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 47 वे शतक आहे. विराट कोहलीने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण केल्या आहेत. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. या बाबतीत विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. विराट कोहलीने 13,000 वनडे धावा पूर्ण करण्यासाठी 267 डाव घेतले, जे जगातील सर्वात वेगवान आहे. सचिन तेंडुलकरने 321 डावात 13,000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. रिकी पाँटिंगने 341 डावात 13,000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.

शिवाय विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 77 शतके पूर्ण केली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
1. सचिन तेंडुलकर (भारत) – 100  शतके
2. विराट कोहली (भारत) – 77 शतके
3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 71 शतके
4. कुमार संगकारा (श्रीलंका) – 63 शतके
5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 62 शतके
6. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) – 55 शतके

https://youtube.com/shorts/H091HG5c0C4?si=mv9vdKMURQ-iS0qa

महत्त्वाच्या बातम्या-

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी :- नाना पटोले

उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल – बावनकुळे

नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस सोडून कोणीही सुखी नाही :- नाना पटोले