Bhaskar Jadhav: वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा; भास्कर जाधव यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला

Bhaskar Jadhav vs Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे यांना घरकोंबडा म्हणणाऱ्या भाजपच्या प्रदेक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भास्कर जाधव यांनी चांगलेच सुनावले आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी बावनकुळेंवर टीका करताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी तोंडावर लगाम लावावा, असे म्हटले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल कारण त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे. खरे तर सत्तेसाठी तुम्ही ‘हपापले होते आणि आहात, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.

यावर प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे नेहमी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात. कधी घरकोंबडा तर आणखी काही म्हणतात. वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचं नाही. आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही वाटेल ते बोलणार का? हे चालणार नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. इतकंच नाही, तर वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा, असा शब्दांत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बावनकुळे यांना टोलाही लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलंस..! नुकताच बाप बनलेल्या बुमराहला पाकिस्तानी गोलंदाज आफ्रिदीने दिली खास भेट

नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”, Rohit Sharmaचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा

विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज