भरदिवसा व्यावसायिकावर गोळीबार, जखमी झालेल्या संजय बियाणींचा उपचारादरम्यान मृत्यू

नांदेड – राज्यात कायदा सुव्यस्था किती बिघडली आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. नांदेड (Nanded crime news) शहरात भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. संजय बियाणी असं मृत व्यावसायिकाचं (businessman Sanjay Biyani) नाव आहे.

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, गोळीबारात आधी बियाणी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहरातील शारदानगर येथील त्यांच्या घरासमोरच गोळीबार करण्यात आला . सुरुवातीला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे गोळीबारात गंभीर जखमी झाले. दोन दुचाकीवर आलेले आरोपी त्यांच्या घराजवळ दबा धरून बसले होते. त्यांनीच हा गोळीबार केला.

या घटनेत त्याचा चालक देखील जखमी झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आणि आरोपीचा शोध सुरू आहे. खंडणीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.