मुख्यमंत्री कार्यालयावर केलेल्या आरोपाप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता 

Mumbai Police Notice To Sanjay Raut : वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे खासदार संजय राऊत यांना महागात पडू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे मुख्यमंत्री कार्यालयावर केलेल्या आरोपाप्रकरणी आता संजय राऊत यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील काही अट्टल गुन्हेगारांशी संपर्क केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री कार्यालयाने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून त्याची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 7 कडून संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चालवली जात असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता.  आता या प्रकरणी संजय राऊत यांना नोटिस पाठवण्यात आली असून केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास सांगितल्याची माहिती आहे.