संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही, संभाजी महाराज धर्मवीर नव्हते  – अजित पवार 

नागपूर – गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान हा कळीचा मुद्दा बनला असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar On Dharmaveer)  म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार  ?

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा, असे अजित पवार म्हणाले.