Rohit Sharma: विश्वचषकादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मावर पोलिसांची मोठी कारवाई

Rohit Sharma Overspeeding Chalan: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर ओव्हरस्पीडिंगचा आरोप होत असल्याच्या बातम्या येत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) त्याने ताशी 200 किमी पेक्षा जास्त वेगाने कार चालवली. असे करणे रोहितला भलतेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याच्यावर ओव्हरस्पिडची कारवाई करत तीन चलान कापले आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रोहितने ओव्हरस्पीड केल्याचे बुधवारी मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले. तो मुंबईहून पुण्याला त्याच्या वैयक्तिक लॅम्बोर्गिनी कारने सरावासाठी गेला होता. तिथे पोहोचण्यासाठी रोहितने ताशी 200 किमी वेगाने गाडी चालवली. अनेक वेळा त्याच्या कारचा वेग 215 किमीपर्यंत पोहोचला होता.

ओव्हरस्पीडिंगमुळे वाहतूक पोलिसांनी रोहित शर्माच्या नावावर 3 ऑनलाइन चलान लावले आहेत. रोहितने गाडी चालवली ती जागा अतिशय वर्दळीची होती आणि ओव्हरस्पीडिंग करून रोहित स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत होता, असेही सांगण्यात आले. विश्वचषकादरम्यान रोहितने पोलिस सुरक्षेत टीम बसमधून प्रवास करावा, असा सल्लाही त्याला देण्यात आला होता.

दरम्यान रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग चौथा सामना जिंकला आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध झालेला सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. आता भारतीय संघ त्यांचा पुढील विश्वचषक सामना 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे खेळेल.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर