“सीमा हैदर परत आली नाही तर भारताचा नाश… 26/11 प्रमाणे…”; मुंबई पोलिसांना धमकी

Seema Haider: पब्जी गेम खेळणारा भारतीय तरुण सचिन चार मुलांच्या पाकिस्तानी आई सीमा हैदर हिच्या प्रेमात पडला. ही महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती अवैधरित्या नैपाळमार्गे तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. सीमा हैदर भारतीय तरुण सचिनसोबत राहात असली तरीही तिच्या पतीने भारत सरकारकडे सीमाला पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे.

हे प्रकरण चर्चेत असताना मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोलला एक धमकी वजा मैसेज आला आहे. सीमा हैदर प्रकरणावरुन हा मैसेज करण्यात आला असल्याचे समजत आहे.

मेसेज करणाऱ्या व्यक्तीने, “सीमा हैदर ही परत आली नाही तर भारताचा नाश… 26/11 प्रमाणे परत येण्यासाठी स्वत:ला तयार करा. या करिता उत्तरप्रदेश सरकार जबाबदार राहील” अशा प्रकारचा मैसेज केला आहे. या मैसेजनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.