विश्वचषक सुरू असताना आफ्रिदी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, क्रिकेटरने जड अंत:करणाने सांगितली बातमी

Shahid Afridi’s Sister Passed Away : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सोमवारी आपल्या चाहत्यांशी एक अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी शेअर केली. आफ्रिदीने सोशल मीडियावर लिहिले की, त्याच्या बहिणीची तब्येत नाजूक झाली होती, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आफ्रिदीने चाहत्यांना बहिणीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. मात्र मंगळवारी सकाळीच आफ्रिदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

शाहिद आफ्रिदीच्या बहिणीचे निधन
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद खान आफ्रिदीच्या बहिणीचे मंगळवारी निधन झाले. शाहिदने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्याने लिहिले, “जड अंतःकरणाने, आम्ही तुम्हाला कळवत आहोत की आमच्या प्रिय बहिणीचे निधन झाले आहे आणि तिची नमाज-ए-जनाजा 17.10.2023 रोजी जकेरिया मस्जिद मेन 26 वी स्ट्रीट खयाबान-ए-गालिब DHA येथे जुहूर नमाजनंतर होणार आहे.”

आफ्रिदीला 11 भावंडे आहेत
शाहिद आफ्रिदीला 5 भाऊ आणि 5 बहिणी आहेत. त्याचे भाऊ अश्रफ आफ्रिदी आणि तारिक आफ्रिदी हे देखील क्रिकेटपटू राहिले आहेत. दोघेही देशांतर्गत क्रिकेट खेळले पण शाहिदप्रमाणे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही.

शाहीन विश्वचषक खेळत आहे
पाकिस्तानचा संघ भारतात विश्वचषक खेळत आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) देखील संघाचा एक भाग आहे. काही काळापूर्वी शाहीनचे शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न झाले होते. आता शाहीनच्या पत्नीच्या आत्याचे निधन झाले आहे. पाकिस्तानला आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये खेळायचा आहे. यासाठी टीम तेथे पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा