LokSabha Elections 2024 | विविध पक्षांच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल; पहा कोण कुठे नशीब आजमावतेय

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections 2024) तिसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. काल अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यात, चुरशीच्या समजल्या जात असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात काल महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. तर, याच मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्याचबरोबर, महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही शक्तीप्रदर्शन करत काल आपापला उमेदवारी अर्ज भरला. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील तटकरे, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून, महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, सातारा लोकसभा मतदार संघातून, भाजपातर्फे काल खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

सांगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. लातूरचे भाजापाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
लातूर लोकसभा मतदारसंघात काल एकंदर 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (LokSabha Elections 2024) शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी काल भारतीय जवान किसान पार्टीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने समनक जनता पक्षाचे उमेदवार अनिल राठोड यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितचे अधिकृत उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले