“शाहरुखने मला बिग बॉसमध्ये पाहिलं, त्याचा पठाणमधील लूक माझ्यासारखा,” अभिजीत बिचकुलेचा दावा

मुंबई- बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा आगामी ‘पठाण’ (Pathaan) चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दृश्यांमुळे हा चित्रपट विवादात सापडला असून परिणामी त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच आता बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत बिचकुले (Abhijit Bichkule) याने या चित्रपटातील शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) लूकवर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. पठाणमधील शाहरुखचा लूक माझ्यासारखा आहे, असा दावा बिचकुलेने केला आहे.

मंगळवारी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना बिचकुले म्हणाला, “कोणीतरी ट्वीट केलं आणि ती बातमी प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यात म्हटलं आहे की शाहरुख खानचा पठाणमधील लूक (Shahrukh Khan Look In Pathaan) माझ्यासारखा दिसतो. ही एक सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल होती. १९९१ मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबा म्हणजे संजय दत्तचे लांब केस होते. मात्र, आता २२ वर्षांनी जी स्टाईल आणली गेली ती माझी.”

“मला वाटतं शाहरूख खान बिग बॉस बघत होता. सिझन नंबर १५ मध्ये मी काय करिष्मा केला, ‘मैंने क्या गुल खिलाए’ हे शाहरूखनेही पाहिलं आहे. लोकांनीही ते पाहिलं आहे. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी,” असं मत अभिजीत बिचुकलेने व्यक्त केलं.

अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला, “शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल तशी होती. मला वाटतं शाहरूख खान बिग बॉस बघत होता. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी.”