‘जावेद भाई…अपना हार्मोनीयम पैक कर लो… सलीम भाई को गाना सुनना हैं’

मुंबई – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मंत्री आणि गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या शिवसेनेचा दावा आता किती हास्यास्पद होता हे देखील समोर आले आहे. सोशल मिडीयावर आता सेनेची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. सेनेप्रमानेच राष्ट्रवादीची देखील अवस्था असून खासदार शरद पवार यांना देखील ट्रोल केले जाऊ लागले आहे. दुसऱ्या बाजूला पंजाबमध्ये भाजप,कॉंग्रेस, अकाली दल आदी पक्षांना धूळ चारणाऱ्या आपवर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पियानो वाजवाल होता. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी हार्मोनियम वाजवला होता. भाजप नेते मोहीत कंबोज (Mohit kamboj tweet) यांनी हीच आठवण राऊतांना करून दिली आहे. मोहीत कंबोज यांनी संजय राऊतांचा एक फोटो ट्विट करत, जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, असे ट्विट राऊतांना उद्देशून केले आहे.