राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

Sharad Pawar Meets Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे गेले असता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाल्याचे समोर आले आहे. राज्यसभेत कॅफेटेरिया येथे आज शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्वांनी एकत्रित येत फोटो देखील क्लिक केला. हा सर्व नेत्यांचा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केला आहे.

प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या आज झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी हा फोटो शेअर करत असे म्हटले की, नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस! राज्यसभेचं चेंबर हे एक चमत्कार आहे. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनला. कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Utsav 2023: भगवान गणेशाच्या ‘या’ १२ अवतारांचे आहे खास महत्त्व, वाचा बाप्पांबद्दल खास गोष्टी

Ganesh Chaturthi 2023: अशा प्रकारे घरी बनवा गणपतीचा आवडता मोदक, सर्व इच्छा होतील पूर्ण!