Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

Anand Mahindra:  भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. या सामन्याचा खरा शिल्पकार राहिला मोहम्मद सिराज. सिराजने (Mohammed Siraj) ७ षटके टाकताना केवळ २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

दरम्यान प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराज याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत लिहिलं की, “मला वाटत नाही की याआधी आमच्या विरोधकांसाठी माझे हृदय कधी रडले असेल… जणू काही आम्ही त्यांच्यावर अलौकिक जादू केली आहे… मोहम्मद सिराज तुम्ही मार्वल अॅव्हेंजर आहात…. ” दुसरीकडे, आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. युजर्संनी आनंद महिंद्रा यांच्याकडे अजब मागणी केली. नवी एसयुव्ही गिफ्ट करण्याची मागणी केली. एका युजरने लिहिलं की, सिराजला एक एसयुव्ही द्या. या पोस्टवर रिप्लाय देताना आनंद महिंद्रा यांनी सांगितलं की, तशी सोय करण्यात आली आहे.

यापूर्वी दिली होती एसयुव्ही
मोहम्मद सिराज याच्या घरी लवकरच एसयुव्ही कार येईल, अशी आशा वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी यापूर्वीही मोहम्मद सिराजला एसयुव्ही दिली आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सिराजसह सहा क्रिकेटपटूंना थार एसयुव्ही गिफ्ट दिली होती. यावेळी सिराजने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून आभार व्यक्त केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Utsav 2023: भगवान गणेशाच्या ‘या’ १२ अवतारांचे आहे खास महत्त्व, वाचा बाप्पांबद्दल खास गोष्टी

Ganesh Chaturthi 2023: अशा प्रकारे घरी बनवा गणपतीचा आवडता मोदक, सर्व इच्छा होतील पूर्ण!