त्यांची श्रद्धा रामावर आहे, तर आमची…; शरद पवारांची अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांवर टीका

Mumbai – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केलं. रविवारी दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भूसे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

या दौऱ्यात शिंदे यांनी आपला हिंदुत्ववादी बाणा कायम ठेवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येत श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी गेले असून त्यांची श्रद्धा रामावर आहे, तर आमची श्रद्धा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यावर आहे अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये केली. पवार यांनी माध्यमांशी बोलताना सरकारच्या भूमिकेवर टीका केली. अवकाळी आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत अशा वेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा मुख्यमंत्री अयोध्येला गेले आहेत ते योग्य नाही, असं पवार म्हणाले.