राहुल गांधी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत कॉंग्रेसचे भाजपविरोधात आंदोलन  

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.लोकसभा सचिवालयानं (Lok Sabha Secretariat)  काल जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गांधी यांना सुरत न्यायालयानं (Surat Courts) दोषी ठरवल्यापासून म्हणजे 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.

राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 (3) नुसार, कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला आणि किमान दोन वर्षे कारावासाची शिक्षा झालेला खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासून अपात्र ठरेल अशी तरतूद आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. सध्या भाजपकडून राहुल गांधी यांच्यानिमित्ताने ओबीसीचा मुद्दा पुढे करून  राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या आहेत. तसेच काल सोलापुरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले होते.आज काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी सोलापुरात युवक काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यामुळे आता काँग्रेस राहुल गांधी यांच्यासाठी रस्त्यावर उतरत त्यांनी भाजपविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे.