शेअर बाजारात पैसे गुंतविले आहेत? मग वाचा ही महत्वाची बातमी

तब्बल 6 लाख कोटीचे नुकसान

या आठवडी बाजाराच सुरुवात फारच नकारात्मक झाली आहे. सोमवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्ससेक्स तब्बल 1150 अंकांनी घसरला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 16700 अंकासाठी खाली आली. सेन्सेकस आणि निफ्टीमध्ये देखील दीड टक्क्यांनी घसरण झाली आहे. आज सर्वाधिक फटका हा एचडीएफसी बँक, रिलायन्स,आसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक यांना फटका बसला आहे. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समधील गुंतवणूककमी होताना दिसत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी देखील शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.

सेन्ससेक्स 889.40 अंकाच्या घसरणीत 57,011.74 बंद झाला. निफ्टीमध्ये देखील 263. 20 अंकाची घसरण झाली. आठवड्याच्या सुरुवातीला सुधारणा होऊ शकते असा अंदाज वर्तविला गेला होता पण तसे काही झाले नाही. शेअर बाजार कोसळल्याने तब्बल 6 लाख कोटीचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे शेअर बाजार घसरत आहे असे म्हटले जात आहे.