Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार आहेत, पण…; संजय राऊत मोदींवर बरसले

Sanjay Raut : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या भाजपा कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात भाजपा आणि महायुतीला बळ मिळेल असं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

आपल्या राजकीय कारकिर्दीची ही नवी सुरुवात असून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारुन पूर्णपणे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राज्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. चव्हाण यांच्याबरोबर माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता अपेक्षेप्रमाणे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे भाजपवर बरसले आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन तुम्ही ४०० (लोकसभेच्या जागा) पार करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचं स्वप्नभंग होईल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही घाबरलेले आहात. तुम्ही लटपटत आहात. एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणांना घ्यावं लागतंय. मोदींचा चेहरा एवढा तेजस्वी आणि प्रखर आहे. नरेंद्र मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार आहेत ना, प्रभू श्रीरामाचं बोट धरून जात आहेत, पण शेवटी त्यांना अनेक असे छोटेमोठे रावण घेऊन २०२४ च्या निवडणुका जिंकण्याची वेळ आलीय, हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड आहे, अशी जहरी टीका संजय राऊतांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!