मोठी बातमी! अशोक चव्हाण यांच्यासह ‘या’ दोघांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

BJP Candidates For Rajya Sabha Biennial elections: महाराष्ट्रात आगामी राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज दुपारी भाजपाकडून राज्यसभेसाठी ३ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपानं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे नांदेडचे नेते असून त्यांनी कालच काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. यानंतर आता भाजपाने राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांचे नाव दिले आहे. अशोक चव्हाणांप्रमाणेच अजीत गोपछडे (Ajit Gopchhade) हेदेखील मूळचे नांदेडचे आहेत.  सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. तर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यावरही भाजपाने राज्यसभेसाठी विश्वास दाखवला आहे.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!