मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा, दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की

Shinde Group MLA Fight : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र असणार आहे. या निवडणुकांमध्ये अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अशातच आता महायुतीचा भाग असलेल्या शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी विधीमंडळाच्या लॉबीत एकमेंकांना धक्काबुक्की केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते. त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले, त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे, यावरुन राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल