शिल्लक सेना व पेंग्विन सेनेने नौटंकी करू नये; शिंदे गटाचा ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा

करमाळा (प्रतिनिधी) –  आरोग्य मंत्री तानाजी  सावंत यांचा काल सोलापूर जिल्हा दौरा झाल्यानंतर  शिल्लक सेना व पेंग्विन सेनेच्या काही नौटंकी कलाकारांनी रस्ता गोमुत्राने स्वच्छ करून घेणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शुद्धीकरण  करणे अशी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंदोलने केली या कृतीचा सोलापूर जिल्हा शिवसेना निषेध करत असून आगामी काळात अशी नौटंकी केल्यास अशा नोटंकी कार्यकर्त्यांना त्यांची जागा शिवसैनिक दाखवून देतील असा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे. जिल्हाप्रमुख महेश चिवटे चरण राज चवरे अमोल बापू शिंदे मनीष काळजै सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवाल मोहोळ तालुका प्रमुख बापू भोसले माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे आहे की, शिल्लक सेना व पेंग्विन सेना मध्ये सोलापूर जिल्ह्यात नौटंकी करणारे अनेक बाजार भुंगे कार्यकर्ते आहेत काल केवळ पाच ते सहा कार्यकर्त्यांनी माळशिरस मध्ये रस्त्यावर पाणी शिंपताना चे फोटो काढले व या माध्यमातून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी दुसऱ्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रकार मोहोळ मध्ये सुद्धा काही भामट्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अर्पण केल्यानंतर पुतळ्याला अभिषेक करण्याची नौटंकी केली . एका दारुड्याने मंत्री सावंत सरांचे विरोधात घोषणा दिल्या त्याच्याबरोबर दुसरा एक सुद्धा माणूस नव्हता मात्र या घटनेचे भांडवल करून प्रसिद्धी माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरण्याचे काम बाजार भुंगे कार्यकर्ते करत आहेत.

अशा वैफल्यग्रस्त कार्यकर्त्यांना आपण असे कृत्य केल्यानंतर शिल्लक सेना व पेंग्विन सेनेचे अध्यक्ष आपला पर्यावरण खाते व मुंबई महानगरपालिका मधील भ्रष्टाचाराच्या खोक्यांनी भरलेल्या मातोश्री मध्ये आपला सत्कार करतील अशा आशेने हे आंदोलने केली जातात. अशा करणाऱ्या भोंदू कार्यकर्त्यांना जिल्हा ओळखून आहे.सोलापूर जिल्ह्यातील सध्याच्या शिल्लक सेना व पेंग्विन सेनेचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर खोके मातोश्री चा विश्वास नसल्यामुळे वाळू तस्करांना पदे द्यावी ही लागत आहेत याचीही दखल जनतेने घेतलेली आहे.

मात्र इथून पुढे अशा पद्धतीने शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार खासदार आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत आमदार शहाजी बापू पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यास जशास तसे उत्तर देऊ असेल शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

गद्दार कोण याचेआत्मपरीक्षण शिल्लक सेना व पेंग्विन सेनेने करावे करावे!!

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद व पर्यटन मंत्री पद मिळवणारे काय समाजसेवक आहेत काय? शरद पवार व सोनिया गांधी यांची खुश मस्करी करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बांधणाऱ्यांनी खरे गद्दार कोण आहे याचे आत्मपरीक्षण शिल्लक सेना पेंग्विन सेनेच्या नोटंकी कार्यकर्त्यांनी यांनी करावे असे मत जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे.