Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Devendra Fadnavis | आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही. तर ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. देशाचा नेता कोण होईल? हा देश कोणाच्या हाती चालवायला द्यायचा? हे ठरवणारी ही निवडणूक आहे, तेव्हा मत कोणाला द्यायच हे आपण विचार करून ठरवा, असे आवाहन भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मतदारांना केले.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित  सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, आरपीआय (आठवले गट)चे रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आदी सह महायुतीच्या घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

बारामतीला कोणीच थांबू शकतनाही. तसंच सुनेत्रा वहिनींना देखील कोणी थांबवू शकत नाही बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जाती ल, असा विश्वास व्यक्त करत फडणवीस म्हणाले, मागील 25 वर्ष अजित पवार यांनी मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली. आज बारामतीचे जे रूप आहे ते अजित पवारांमुळेच आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनीत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही तर लढाई देशाचा नेता निवडण्याची आहे देशाचा नेता कोण होईल? कोणाच्या हाती देश चालवायला द्यायचा? हे ठरवणारी ही निवडणूक आहे, असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात