Amol kolhe | नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो पण…; अमोल कोल्हे विरोधकांवर बरसले 

Amol kolhe | आता फक्त ट्रेलर दाखवतो. पिक्चर दाखवायला आपल्याकडं लय वेळ हाय. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचे ठरलंय, बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन् विजयाची तुतारी फुंकायची असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत बोलताना ते म्हणे,  मी पहिल्यांदा संसदेत गेलो तेव्हा मला सुपिया सुळे यांनी सांगितले होते की, जेव्हा जनतेच्या धोरणाविषयी चर्चा होईल, देशाच्या भवितव्याविषयी चर्चा होईल तेव्हा डोळ्यात तेल घालून जागा रहा. तेव्हा तुझा आवाज सर्व सामान्य लोकांसाठी गरजला पाहिजे, हे सुप्रिया सुळेंनी मला शिकवले असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol kolhe) म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले की, नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो. पण धोके सम्राट, खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही. आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबा, पाहिजे तेवढा निधी देतो. कर काय ह्यांच्या खिशातला आहे का? अहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन् त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का? असा सवालदेखील अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले