Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

महाविकास आघाडीचे बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जाहीर सभेतून सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

आमच्या विरोधात १८ वर्षांत न बोलणारे आज आमच्याविरोधात वैयक्तिक टीका करत आहेत. मी आणि अमोलदादा कुणावरही अशी टीका करत नाही. ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हातात घेतली आहे. लोकं दबक्या आवाजात फोन करतात आणि मला सांगतात मला धमकीचे फोन आले होते. पण सगळ्यांना मी सांगते जो तुम्हाला धमक्या देतो आहे ना त्याला फक्त माझा नंबर द्या असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढे म्हणाल्या, माझ्यावरही अमोल कोल्हेंसारखीच टीका केली जाते की मी दहा वर्षांत केंद्रातला कुठलाच निधी आणला नाही. मी विनम्रपणे त्यांना सांगू इच्छिते की माझा मराठीत असलेला कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल. तो कार्य अहवाल मी सगळ्यांना पाठवणार आहे. माझा कार्य अहवाल जर तुम्ही वाचला तर जे सगळे टीका करणारे मलाच मतदान करतील याची मला गॅरंटी आहे. ही शब्द देते म्हणून गॅरंटी आहे तसली गॅरंटी नाही. आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन भाषण करणार नाही. माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे. असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात