थेट पाकिस्तानातून सिराजच्या ड्रीम बॉलिंगचे कौतुक, खुद्द शोएब अख्तरही झाला फिदा; म्हणाला…

Mohammed Siraj: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. आशिया चषकावर आपले नाव कोरण्याची ही भारताची आठवी वेळ आहे.

या सामन्याचा खरा शिल्पकार राहिला मोहम्मद सिराज. सिराजने (Mohammed Siraj) ७ षटके टाकताना केवळ २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. आता सर्वजण सिराजची खूप स्तुती करत आहेत आणि त्याच्या स्तुतीचे पूल बांधत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही (Shoaib Akhtar) मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. त्यांनी फक्त २ शब्दात सिराजचे कौतुक केले. मात्र, बांगलादेशकडून भारताचा पराभव झाल्यावर त्यांनी टीम इंडियावर जोरदार टीका केली. पण सिराजच्या स्पेलनंतर त्यांचे शब्द बदलले.

सिराजची कामगिरी पाहून शोएब अख्तरने एक ट्विट केले होते. मात्र, त्याने सिराजचे नाव घेऊन स्तुती केली नाही. पण त्याने ज्या पद्धतीने लिहिलं त्यावरून ते फक्त सिराजबद्दलच लिहित असल्याचं स्पष्ट होतं. अख्तर यांनी ट्विट करून लिहिले की, ‘हा विनाश आणि प्रलय आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण