शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया काय ?

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सकाळपासून सुरु असलेल्या सुनावणीनंतर घटनापीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शिंदे गटाला कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोग पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. याबाबत कोणतीही स्थगिती न देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का मानला जात आहे.(Shiv Sena party symbol decision to Election Commission, what is Shiv Sena’s first reaction?)

दरम्यान, कोर्टात घडलेल्या या घडामोडींवर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आता निवडणूक आयोगात लढू, असं मत व्यक्त केलं. पुढे बोलताना ते म्हणाले, देशात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले युक्तिवाद लाईव्ह दाखवण्यात आला. त्यामुळे देशाला आणि जगाला हा युक्तिवाद पाहता आला. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक मुद्दे मांडले. ते ऐकल्यानंतर न्यायालयाने पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे जाण्याचे निर्देश दिले.

बाकी आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरूच राहील. हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न नाही. संपूर्ण देशाने न्यायालयातील युक्तिवाद ऐकलेत. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो,असंही सावंत यांनी नमूद केलं.