शिवसेना कुणाची ? : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सकाळपासून सुरु असलेल्या सुनावणीनंतर घटनापीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शिंदे गटाला कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोग पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. याबाबत कोणतीही स्थगिती न देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, कोर्टात घडलेल्या या घडामोडींवर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना पक्ष नेमका कोणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, अशी विरोधी पक्षांची मागणी होती, ती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग जे काही निकष असतील त्याच्यानुसार निर्णय घेईल, अशी मोजकी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.