‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार देत काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवसेनेकडून धक्का 

नवी दिल्ली-  देशामध्ये सुरु असणाऱ्या जातीयवादी हिंसाचारावर कारवाई करण्यासंदर्भात केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रवर १३ विरोधी पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या. मात्र या १३ पक्षांमध्ये शिवसेनेचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महाविकास आघाडीत कोणत्याही विषयावर एकमत नसते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

या पत्रावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. देशामध्ये शांतता आणि एकता कायम रहावी अशी मागणी करत या हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या पत्रामधून करण्यात आलीय. हे पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन लिहिलं असून पत्रामध्ये देशात सुरु असणाऱ्या हिंसाचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (narendra Modi) मौन धक्कदायक असल्याचं म्हटलंय.  मागील काही काळापासून द्वेषपूर्ण भाषणांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला जात असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आलीय.

धार्मिक कार्यक्रमांदरम्यान होत असणारा हिंसाचार हा चिंतेची बाब असल्याचं पत्रात म्हटलंय. मात्र या पत्रावर सेनेने का सही केली नाही आता याबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.