‘रोज ८ किलो मटण खातात, हे लाजिरवाणे…’ पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर भडकला वसीम अक्रम

Wasim Akram On Pakistani Players Fitness: अफगाणिस्तानकडून झालेल्या (Pakistan vs Afghanistan) पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील संघावर टीका केली. विश्वचषक 2023 च्या 22 व्या सामन्यात अफगाणिस्तानकडून 6 चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानला आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

वसीम अक्रम म्हणाला की, पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेस स्तरावर खूप काम करण्याची गरज आहे. पाकिस्तानला चालू स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याचा त्यांचा मार्ग खडतर झाला आहे. एकदिवसीय इतिहासात अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिला पराभव ठरला.

हे लाजीरवाणे आहे. 280-290 चा स्कोअर मोठा होता आणि फक्त दोन विकेट्स. खेळपट्टी ओली नव्हती. क्षेत्ररक्षण खराब होते. तुमची फिटनेस पातळी पहा. गेल्या दोन वर्षांत एकही फिटनेस चाचणी झाली नसल्याबद्दल आम्ही बोललो आहोत. मी इथे कुणाचे वैयक्तिक नाव घेतले तर त्यांना ते आवडणार नाही. असे दिसते की तो दररोज 8 किलो मटण खातो, अशा शब्दांत वसीम अक्रमने पाकिस्तानी खेळाडूंवर निशाणा साधला आहे.

अक्रमने गंभीर आरोप केले
पाकिस्तानी खेळाडूंना फिटनेस टेस्ट आवडत नसल्याचंही वसीम अक्रम म्हणाला. या चाचण्या माजी मुख्य प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक यांच्याकडून हाताळल्या जात होत्या, परंतु या चाचण्या संघाला मूलभूत गोष्टी योग्य बनविण्यात मदत करतात. चाचण्या झाल्या पाहिजेत. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही देशासाठी खेळत आहात आणि त्यासाठी तुम्हाला पैसे दिले जात आहेत. मी मिसबाहसोबत आहे. प्रशिक्षक असताना त्यांची ही शैली होती. खेळाडूंनी त्याचा तिरस्कार केला. पण ते संघासाठी कामी आले, असे अक्रमने स्पष्ट सांगितले.

क्षेत्ररक्षण म्हणजे फिटनेस आणि ते मैदानावर दिसून येते. आता आम्ही प्रार्थना करणार अशा ठिकाणी पोहोचलो आहोत. तुमचे सामने जिंकण्यासाठी प्रार्थना करेल. इतर संघ हरण्याची वाट पाहू. तरच उपांत्य फेरी गाठण्यास मदत होईल, असेही अक्रमने म्हटले.

https://youtu.be/_O7XOEdnngI?si=dWo8PCZVDaXHz5wr

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ