Putin Heart Attack : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले

Vladimir Putin Had Heart Attack: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा मोठी माहिती समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी पुतिन त्यांच्या बेडरूममध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. WION च्या बातमीनुसार, क्रेमलिन इनसायडर नावाच्या एका टेलिग्राम चॅनेलने याबाबत माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, एका सुरक्षा कर्मचाऱ्याला पुतिन बेडरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आजारी असल्याची कुजबुज पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पुतीन स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असून त्यांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या गेल्या वर्षभरापासून येत होत्या.

व्लादिमीर पुतिन यांना रविवारी संध्याकाळी त्यांच्या मॉस्को येथील खाजगी अपार्टमेंटमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचं टेलिग्राम चॅनेलच्या हवालाने सांगण्यात येत आहे. क्रेमलिनच्या एका माजी अधिकाऱ्याचं हे टेलिग्राम चॅनेल असून त्यांनी या घटनेची माहिती दिली. या माहितीनुसार, बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या पुतिन यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. ताबडतोब डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आणि नंतर डॉक्टरांनी पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान केलं.

https://youtu.be/_O7XOEdnngI?si=dWo8PCZVDaXHz5wr

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ