Shivsena | मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

Shivsena | मराठा आरक्षण आंदोलनासह शेतकरी आंदोलनात अग्रेसर असलेले, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेवासा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.

यात ॲड.कारभारी वाखुरे,भाऊसाहेब वाघ यांचे नेतृत्वाखाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसेच यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील उबाठाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यात प्रकाश निपुंगे,संतोष माळवे,संजय शिंदे,ॲड.बाळासाहेब कावळे,ॲड.हर्षल गोरे,संदीप जाधव,वसुदेव जाधव,प्रकाश गरुटे,अमोल मोरे,सुनील शिरसाट,सुनील काळे,गणेश चौगुले,नितीन मीरपगार,अजय डौले,विठ्ठल नेहे,निलेश डौले,सुरेश वाकचौरे,राजेंद्र तांबे,किशोर गादे,रोहिदास सुरशे,चांगदेव माने,आदींचा यात समावेश होता.

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुणबी दाखले व मराठा आरक्षण व समाजाच्या इतर प्रश्नांबाबत जी संवेदनशीलता आणि सकारात्मकता दाखवली तसेच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वोत्तम प्रयत्न केले. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना साथ देऊन त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत अशी भूमिका या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे,शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील,मीराताई गुंजाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज