LokSabha Election 2024 | बॉलीवूड अभिनेता गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार, शिवसेनेत करणार प्रवेश?

LokSabha Election 2024 | बॉलिवूडमधील अभिनेता गोविंदाला कोण ओळखत नसेल? आता गोविंद राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोविंदा या वर्षी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवू शकतो, अशी बातमी आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी गोविंदाचे नाव चर्चेत आहे. सूत्रांच्या हवाल्याने गोविंदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील होण्याची शक्यता आहे. तो शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक (LokSabha Election 2024) लढवू शकतो.

माध्यमातील वृत्तानुसार, उत्तर पश्चिम लोकसभा जागेच्या शर्यतीत गोविंदाचे नाव चर्चेत आहे. गोविंदा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करू शकतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने वर्षा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ठाकरे यांनी उत्तर पश्चिम जागेसाठी महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. गजानन कीर्तिकर यांचे वय लक्षात घेऊन त्यांच्या जागी गोविंदाच्या नावाची चर्चा होत आहे.

याआधी गोविंदाने 2004 मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. या जागेसाठी यापूर्वी अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांच्याशीही चर्चा झाली होती मात्र अक्षय आणि नानांनी नकार दिला व माधुरी दीक्षितकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत आता गोविंदाच्या नावाची चर्चा आहे. मात्र गोविंदाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज