Mumbai News | साप्ताहिक अयोध्या सुपरफास्ट ट्रेन रोज चालवण्याची मागणी

Mumbai News |अयोध्या धाममध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मुंबईहून अयोध्या धामकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनासाठी प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे क्रमांक 22103 अयोध्या कॅन्टोन्मेंट सुपरफास्ट साप्ताहिक गाडी नियमितपणे रोज चालवावी अशी मागणी मुंबई (Mumbai News) भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे व्यवस्थापक राम करण यादव यांना पत्राद्वारे केली आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.

मुंबईतून अयोध्येसाठी रोज गाडी सुरू झाल्यास लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी/स्लिपर कोचमध्ये वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय देखील दूर होईल. यावेळी डॉ. रमाशंकर भारतीय, आर.डी. यादव, सुरेश पाल, दीपनारायण मिश्रा, अभय झा, दयाशंकर यादव, कृपाशंकर दुबे, ब्रिजेश पाल आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज