‘धनुष्यबाणा’च्या लढाईत शिवसेना पराभवाच्या छायेत ? संजय राऊत यांचे सूचक ट्वीट 

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, या बंडामुळे शिवसेनेची (Shivsena) चांगलीच नाचक्की झाली असून आता शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातून जाईल अशी शक्यता आहे. विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे.
या लढाईत देखील शिवसेनेनं हार मानली असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहेत. राऊत यांनी केलेल्या ताज्या ट्विटमधून याचे संकेत मिळत आहेत.जब खोने के लिए कुछ भी ना बचा हो तो पाने के लिए बहुत कुछ होता हैं !.  जय महाराष्ट्र !. असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. या ट्विटचा काय अर्थ आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

शिवसेनेला पक्षाचं चिन्ह (Party symbol) सोडण्याची जाणीव झाली असून त्याचा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे, असं मानलं जात आहे.दरम्यान,  यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही नव्या चिन्हासाठी तयार राहावं असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे. ‘या प्रकरणातील कायदेशीर लढाई आपण लढू पण, नवं चिन्ह मिळालं तर ते चिन्ह सर्वांपर्यंत पोहचवा’ असा आदेश ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.