Breaking : शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई – कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रजनी मंगेश कुडाळकर (Rajani Kudalkar) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Shivsena MLA Mangesh Kudalkar’s wife commits suicide)नेहरु नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रजनी कुडाळकर या 42 वर्षांच्या होत्या. रजनी या मंंगेश कुडाळकर यांची दुसरी पत्नी असून, पहिल्या पत्नीच्या अपघाती निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. रजनी यांनी घरगुती वादातून हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकड़ून वर्तवण्यात येत आहे.

याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे नेहरू नगर  पोलिसांनी सांगितले आहे.पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.