‘…तर प्रभू श्रीराम पुन्हा वनवासात जातील’; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका

Sanjay Raut: रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराच्या (Ram Temple) सजावटीला सुरुवात झाली असून हजारो भक्तगण मंदिराला भेट देत आहेत. तसंच, मंदिर प्रशासनाकडूनही नियोजन आढावा घेतला जात आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रमुख पाहुणे असतील. सोबतच देशभरातील अनेक मान्यवर, साधुसंत उपस्थित असतील.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला मात्र विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. देशासाठी ज्यांचं काहीच योगदान नाही त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं. अयोध्येसाठी त्यांचं काहीच योगदान नाही ते राम मंदिर उत्सव करत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे.

संपूर्ण देशात नेत्यांना प्रश्न विचारला जातोय तुम्हाला निमंत्रण आलं का? हा भाजपचा कार्यक्रम आहे. राम मंदिर उत्सव नाही, यूपीमध्ये आणि दिल्लीत भाजप सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामाचे अपहरण केलं आहे. भाजपचा कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ. आम्हाला आमंत्रणाची गरज नाही आम्ही स्वतःच दर्शनाला जाणार आहे. हा भाजपचा कार्यक्रम आहे त्यांना तो करू द्या, असे देखील संजय राऊत म्हणाले.

त्यांना झेंडा फडकवू द्या, फोटो काढू द्या. आमचं काही म्हणणं नाही, राम सर्वांचे आहेत. असं राजकारण पाहून रामाच्या आत्म्याला त्रास होईल आणि पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करु नका, अशी खोचक टीकाही राऊतांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत ३ जानेवारीला कार्यकर्ता शिबिर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

निधीतील घसरणीवर मात करण्यासाठी काँग्रेसने स्वीकारला क्राऊड फंडिंगचा मार्ग, जाणून घ्या कसा मिळतोय प्रतिसाद

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस परत आणायचे आहेत’