Shreyas Iyer | आयपीएल 2024 मध्ये खेळणाऱ्या श्रेयस अय्यरवर टांगती तलवार, कोलकाता नाईट रायडर्सला बसू शकतो दुहेरी झटका

Shreyas Iyer | आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला दुहेरी फटका बसू शकतो. श्रेयस अय्यर आयपीएल 2024 च्या काही सामन्यांना मुकू शकतो. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पुन्हा जुन्या दुखापतीचा फटका बसल्याची बातमी आहे, त्यामुळे त्याला आयपीएल 2024 मधून बाहेर पडावे लागू शकते. उजव्या हाताच्या फलंदाजाची जुनी दुखापत म्हणजे त्याच्या पाठीची दुखापत, जी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पुन्हा उफाळून आली आहे.

विदर्भाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी फायनलच्या पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावात फॉर्ममध्ये परतत 95 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मुशीर खानसोबत मोठी भागीदारीही केली. पण, त्यानंतर मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विदर्भाचा संघ आला तेव्हा श्रेयस अय्यर मैदानात उतरला नाही. या दुखापतीमुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार