लग्नानंतर राजवाड्यासारख्या घरात राहणार आहे कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्राचा आलिशान बंगला पाहा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या वृत्ताला अद्याप दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे काहीही दुजोरा मिळालेला नाही. पण कियारा आडवाणी नववधूच्या रुपात कोणत्या घरात जाणार आहे? याबद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ मल्होत्राचे घर खूप सुंदर आहे आणि अगदी राजवाड्यासारखे दिसते.

शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने सिद्धार्थ मल्होत्राच्या घराचे इंटीरियर डिझायनिंग केले आहे. दोघांचे घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये असे दिसून येते की, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि गौरी खान देखील डायनिंग एरियामध्ये पोज देताना दिसत आहेत. गौरी खुर्चीवर बसलेली असताना, सिद्धार्थ आरशाच्या मदतीने दुसऱ्या बाजूला उभा असल्याचे दिसत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राच्या घराचा दिवाणखानाही अतिशय आकर्षक आहे, ज्यात तपकिरी रंगाचा सोफा सेट आहे आणि बॅकग्राउंड वॉलपेपर सुंदर कलाकृतींनी बनवलेले आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या घरात वॉक इन क्लोसेटही आहे. ज्यात या फोटोंमध्येही तो आरशाजवळ बसून डॅशिंग पोज देताना दिसत होता. सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या घरी इंटरव्ह्यू रूमही बनवली आहे.