अनाथांची माय हरपली ; सिंधुताई सपकाळ यांचे निधन !

पुणे : अनाथांची आई म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.

आज रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले, पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सिधुताईंनी हजारो अनाथांना आश्रय दिला त्यांची आई झाल्या. त्यांच्या या महान कार्याची दखल घेत सिंधुताईंना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सिंधुताईंनी अनाथांना तर आश्रय दिलाच पण महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा देखील फोडली. महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून ओळख असणारी ‘माय’ आज हजारो अनाथांना पुन्हा पोरकं करून निघून गेल्याने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.