Dadasaheb Phalke Award 2023 : ‘द काश्मीर फाइल्स’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर आलिया-रणबीर जोडप्यालाही मिळाला ‘हा’ पुरस्कार

मुंबई- भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२३’ नुकताच (Dadasaheb Phalke Award 2023) रंगला. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

या पुरस्कार सोहळ्यात द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला. तसेच गंगुबाई काठियावाडी मधील गंगुबाईच्या भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय आलियाचा पती आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ब्रम्हास्त्र सिनेमातील शिवाच्या भूमिकेसाठी रणबीरला या पुरस्काराने गौरवण्यात आले.

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२३ मधील विजेत्यांची यादी…

सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आर बाल्की (चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र: भाग १)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता: ऋषभ शेट्टी (कांतारा)
चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: रेखा
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: रुद्र: द एज ऑफ डार्कनेस
क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता: वरुण धवन (भेडिया)
वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपट: RRR
वर्षभरातील सर्वोत्तम दूरदर्शन मालिका: अनुपमा
यंदाच्या वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेता: अनुपम खेर (काश्मीर फाइल्स)
टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: झैन इमाम (फना-इश्क में मरजावा)
सर्वोत्कृष्ट पुरुष गायक: सचेत टंडन (मैय्या मैनु)
सर्वोत्कृष्ट गायिका: नीती मोहन, मेरी जान
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: पीएस विनोद (विक्रम वेधा)
संगीत उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: हरिहरन