जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; भाजप झुंजार नेत्याचा दावा   

सांगली – भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्या घरावर येत्या काही दिवसात भाजपचा झेंडा फडकताना दिसेल, असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागतो. मी विश्वासाने सांगतो हाच भाजपचा झेंडा येत्या काही काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. पडळकर यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादीचे 90 टक्के कार्यकर्ते म्हणतील आता आपल्याला भाजपात जावं लागेल. मग मुंबईतील जे राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आहे. तिथे नेमका झेंडा कुणाचा लागावा असा त्यांच्यात वाद होईल. त्यामध्ये बहुमताने लोकं म्हणतील आता भाजपमध्येच जाऊया. आता काही पुढं राहिलं नाही, असा दावाही त्यांनी केला.