‘… तर तुमच्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच’

ठाणे – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे नावाचं वादळ आता घोंगावू लागले असून विरोधक देखील  घायाळ चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची  ठाण्यात सभा झाली असून मागच्या सभेपेक्षा ही सभा जोरदार झाली.  गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली.

यावेळी बोलताना राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांबाबत म्हणाले, ‘धर्म आपल्या घरात ठेवावा. भोंगे बंद झाले पाहिजेत हे तेव्हाच मी बोललो होतो. अजित पवारांना ऐकू नाही आले. मी याच्या आधीही बोललो , ऐकू नाही आलं. मी चुकीचं काय बोललो?. मशिदींवरील भोंग्यांचा संपूर्ण देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठे आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

तुम्हाला नमाज पढायचा आहे घरामध्ये पढा, अजान घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते फुटपाथ कशाला अडवताय ? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय?. नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच. वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत. हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे. असं ते म्हणाले.