Vasant More | हत्तीला कळत नव्हतं ती ‘राजाची’ पुण्याई होती; वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची पोस्ट व्हायरल

मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी मंगळवारी तडकाफडकी मनसेच्या प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resigns) राजीनामा दिला. पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आपल्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या आपल्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह आपल्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा दिला. तसेच आपण आता मनसेत (MNS) परतण्याचे सर्व दोर स्वत:हून कापल्याचेही सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी वसंत मोरेंचे कान टोचले आहेत.

फेसबुक पोस्टद्वारे नाव न घेता अविनाश जाधव यांनी वसंत मोरेंवर हल्ला चढवला आहे. ‘एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं,आरती ओवाळली जायची,धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे.त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे.’, असे अविनाश जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यामधील राजा म्हणजे राज ठाकरे आणि हत्ती म्हणजे वसंत मोरे, असे प्रथमदर्शनी तरी सूचित होत आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना मिळत असलेली प्रसिद्धी आणि मानपान हा राज ठाकरे यांचा वरदहस्त असल्यामुळेच होता, असे अविनाश जाधव यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य