कन्नडीगांचा माज वाढला; आता थेट सोलापूर आणि अक्कलकोटवरही केला दावा

बंगरूळ –  सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांची हिम्मत चांगलीच वाढलेली दिसत आहे. त्यांनी ‘सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचा वक्तव्य बोम्मई यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एक इंचही सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत. ‘महाराष्ट्रातील कन्नड भाषिक भाग कर्नाटकचा आहे’, अशी आमची मागणी आहे, असं बोम्मई यांनी म्हटलं आहे.