Raigad LokSabha 2024 | रायगडमध्ये सुनील तटकरे अन् भरत गोगावले यांच्यात दिलजमाई

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी (Raigad LokSabha 2024) महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यांचापुढे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनंत गीते यांचे आव्हान असेल. हे दोन्ही उमेदवार लोकसभेसाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी आता चक्क शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले मैदानात उतरले आहेत. त्यामुळे तटकरे गोगावले यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले हे सातत्याने खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचत होते. त्यांच्यातील बेबनाव रायगडकरांपासून (Raigad LokSabha 2024) लपून नाही. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोघांमधील वैर मैत्रीत बदल्याचे चित्र दिसत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शिवेसना शिंदे गटाने पोलादपूर तालक्यात मेळाव्यांचे आयोजन केले होते. गोगावले यांनी मेळाव्याच्या नियोजनात कुठलीही कसर सोडली नाही.

एरवी तटकरेंवर टीकास्त्र सोडणारे गोगावले यावेळी तटकरेंचे तोंडभरून कौतुक करताना दिसले. आमची सर्व ताकद मतांच्या रुपाने तुमच्या पारड्यात टाकू, तुम्हाला निवडून आणण्यासाठी कुठलीही कसर सोडणार नाही अशी ग्वाही गोगावले यांनी दिली. तटकरे हे मदत करण्याची दानत असलेले नेते असल्याचे प्रशंसोद्गार गोगावले यांनी यावेळी काढले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा